फिलिपिन्सला वादळाचा तडाखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2019
Total Views |

funfon_1  H x W



फिलिपिन्स : मध्य फिलीपिन्समध्ये गुरुवारी झालेल्या वादळामुळे लोकप्रिय पर्यटन स्थळांचा नाश झाला आहे. ऐन ख्रिसमसच्या दिवशी झालेल्या या विनाशक चक्रीवादळ ‘फनफोन’मुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. १९५ किमी वेगाने आलेल्या या वादळामुळे स्थानिकांच्या घरांची छप्परे उडाली. या वादळामुळे फिलिपिन्समधील वीजपुरवठा ठप्प झाला. अजूनही इंटरनेट आणि मोबाइल सेवा विस्कळीत आहेत.


फिलिपिन्सच्या विसायास खेड्यांत आणि गावात १६ जणांच्या मृत्यू झाला आहे. या वादळामुळे बोराके
, कोरोन व अन्य पर्यटनस्थळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाचे तडाखे एकापाठोपाठ एक अनेक बेटांना बसल्याचे पोलिसांनी सांगितले. या वादळात अडकलेल्या १०,००० हून अधिक लोकांना मदत शिबिरात नेण्यात आले आहे. वादळामुळे अनेक शहरे अंधारात बुडाली असून लोकांच्या ख्रिसमसच्या आनंदावर विरजण पडले आहे.

@@AUTHORINFO_V1@@