बीसीसीआयशी 'पंगा' पाकला पडणार महाग?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील वादाचा फटका आता पाकिस्तानच्या खेळाडूंना बसणार आहे. आशियाई संघामध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश करण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मार्च महिन्यामध्ये आशियाई इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन या संघांमध्ये २ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

 

बांग्लादेशचे दिवंगत नेते शेख मुजीबुर रेहमान यांच्या जयंतीनिमीत्त बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आशियाई इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन या २ संघामध्ये टी-२०चा सामना आयोजित केला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कुठल्याही क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्यात आलेले नाही. तरीही, काही महिन्यांपूर्वी दोन्ही मंडळांमध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी करार झाला होता, मात्र पुलवामा हल्ल्यानंतर बीसीसीआयने पुन्हा एकदा कडक पवित्रा घेत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाशी संबंध तोडले. त्यानंतर फक्त आयसीसीच्या मालिकांमध्येच भारत आणि पाकिस्तानचे दोन संघ आमने सामने आले आहेत.

 

आशियाई एलेव्हनमध्ये आशियाई संघ उदा. भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका या संघामधील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश होतो. तर, वर्ल्ड एलेव्हनमध्ये जगातील संघांमधील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश होतो. पंरंतु, यामध्ये आता पाकिस्तान संघाच्या खेळाडूंचा समावेश केला जाणार नाही. तसेच बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार यासारख्या खेळाडूंना पाठवण्याची विनंती केली होती. मात्र, याबाबतीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली घेणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@