खरा नेता तो नाही जो चुकीची दिशा दाखवतो : लष्करप्रमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : "जे नेते लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जातात, ते चांगले नेते नसतात.' असे सांगत नागरिकत्व सुधारणा कायद्यावर चालेल्या राजकारणावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी खंत व्यक्त केली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविरोधात देशातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

"लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे हे नेते नसतात. आपण सध्या शहरांमध्ये विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची हिंसक आंदोलने पाहत आहोत. पण ते हिंसा आणि जाळपोळ करण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत. याला नेतृत्त्व म्हणत नाहीत." अशा शब्दांमध्ये त्यांनी सध्या चाललेल्या राजकारणावर टीका केली.

@@AUTHORINFO_V1@@