अमेरिकेतूनही नागरिकत्व कायद्याचे समर्थन

    25-Dec-2019
Total Views | 59


अमेरिका _1  H x



वॉशिंग्टन
: सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) च्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी या विवादित कायद्याबद्दल चुकीची माहिती आणि मिथके दूर करण्यासाठी अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये मोर्चा काढले.



भारतीय संसदेत नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यापासून भारतात निदर्शने सुरू आहेत. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाने कायद्याचे स्वरूप स्वीकारले. त्याचबरोबर सरकारने मंगळवारी २०२१च्या जनगणनेसाठी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी (एनपीआर) १२
,७००कोटी रुपये मंजूर केले आणि विवादित एनआरसीशी एनपीआरचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.



रॅलीच्या आयोजकांनी असे सांगितले की
," या मोर्चांचा हेतू कायद्याविषयी चुकीची माहिती आणि मिथके दूर करणे तसेच द्वेष आणि अफवांच्या प्रसारास विरोध करणे आहे. भारतीय-अमेरिकन लोकांनी डिसेंबरमध्ये सिएटलमध्ये, २२ डिसेंबर रोजी ऑस्टिनमध्ये आणि २०डिसेंबरला हॉस्टनमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासात सीएए समर्थक मोर्चाचे आयोजन केले होते. २२ डिसेंबर रोजी डब्लिन, ओहायो आणि उत्तर कॅरोलिना येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी सांगितले की डॅलस, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क सिटी, वॉशिंग्टन डीसी, अटलांटा, सॅन जोस आणि इतर ठिकाणीही येत्या काही आठवड्यांत प्रदर्शन करण्याची योजना आखली गेली आहे.



डब्लिन ओहियो रॅलीचे संयोजक विनीत गोयल म्हणाले की
, "आम्ही इस्लामिक आणि डाव्या संघटनांमध्ये सीएए आणि एनआरसीबद्दल असलेली भीती दूर करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. तसेच सीएएसमवेत एनआरसी मुस्लिमांना भारतातून बाहेर काढण्यासाठी आणले जात आहे ही भीती काढून टाकण्यासाठी म्हणून आम्ही या मोर्चाचे आयोजन केले आहे."



सिएटलच्या रॅलीचे संयोजक अर्चना सुनील यांनी सांगितले
, "सीएए आणि एनआरसीच्या विरोधकांकडे चुकीची माहिती आहे. त्यांना कोणतेही तथ्य बोलून किंवा ऐकायचे नाही. उत्तर कॅरोलिनाच्या रॅले येथे झालेल्या रॅलीमध्ये ७०हून अधिक मान्यवर डॉक्टर आणि समुदाय नेते उपस्थित होते. भारतातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि पोलिसांवर हल्ले करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी आणि या कामांमागील राजकीय नेत्यांना सोडले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121