पंतप्रधानांसह सर्व नेत्यांनी वाहिली अटलजींना श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबरला जयंती. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी अटलजींना आदरांजली वाहिली. दिल्लीतील 'सदैव अटल' या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांनी वाजपेयींच्या स्मृतींना नमन केले. तसेच, प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्या भजनांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

 

अटलजींना अभिवादन करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. अटल बिहारी वाजपेयी यांनी ३ वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषविले होते. वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबर हा दिवस 'गुड गव्हर्नन्स डे' म्हणून साजरा केला जातो. २०१४ साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १६ ऑगस्ट २०१८ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते.

@@AUTHORINFO_V1@@