'अटल भूजल योजने'द्वारे पंतप्रधानांचा पाणी बचतीचा संदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 'अटल भूजल योजने'चा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी शेतकरी, तरुणांना 'पाणी वाचवा' असे आवाहन करत पाणी बचतीचा संदेश दिला. दिल्लीच्या विज्ञान भवनात त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

 

गावागावात पाणी पोहोचवण्यात यावे, यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचे ठरवले आहे. यासाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींच्या अटल जल योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अटल जल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा लाभ ६ राज्यांना होणार आहे. देशातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या सहा राज्यांचा यामध्ये समावेश आहे.

@@AUTHORINFO_V1@@