आता नाशिकची मिसळ सर्वात भारी... महाराष्ट्र पर्यटनने केले कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नाशिक : झणझणीत मिसळ म्हणून आधी पुणे, कोल्हापूरची मिसळ जगभर प्रसिद्ध आहे. परंतु आता सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक आता मिसळीसाठी ओळखले जाणार आहे. नाशिकच्या मिसळचा स्वाद अव्वल असल्याचे ट्विट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले. तसेच, नाशिकने सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे नाशिकच्या ओळखीत आणखी भर पडली आहे असेदेखील त्यांनी लिहिले आहे.

 
 
 

वाईन कॅपिटल म्हणून सातासमुद्रापार नाशिकची ओळख आहे. तसेच, धार्मिक स्थळ म्हणून देखील नाशिकची ओळख आहे. आता झणझणीत मिसळमुळे नाशिकच्या ओळखीत आणखी भर पडणार आहे. मिसळच्या स्पर्धेमध्ये याआधी पुणे आणि कोल्हापुरी मिसळने आपले स्थान निर्माण केले होते. तसेच, कृषी पर्यटन केंद्रात मिसळचीच चलती आहे. आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मिसळचे कौतुक केल्याने नाशकातील मिसळ विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

@@AUTHORINFO_V1@@