संघनिवडीवर भज्जीचा नाराजीचा सूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |


af_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारतीय संघाच्या निवडी प्रक्रियेमध्ये भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप भारताचा फिरकिपटू हरभजन सिंग याने केला आहे. सुर्यकुमार यादव या खेळाडूवर या निवड प्रक्रियेत अन्याय झाल्याचे मत हरभजनने व्यक्त केले आहे. बईकर फलंदाज सूर्यकुमार यादव याला श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियात स्थान दिल्याबद्दल हरभजनने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

हरभजनने सूर्यकुमारला टॅग करून लिहीले की, सुर्यकुमार यादवने नेमकी काय चूक केली आहे? अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे त्याने चांगल्या धावा केल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघ, भारत अ, भारत ब संघाच्या निवडीसाठी क्रिकेटपटूंसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा सवालही हरभजनने उपस्थित केला आहे.

 
 
 

सुर्यकुमारने ७३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४ हजार ९२० धावा केल्या आहेत. यामध्ये १३ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. या २९ वर्षीय खेळाडूची सरासरी ४३.५३ इतकी आहे. टी-२० मध्ये तो १४९ सामने खेळला आहे. त्यात त्याने ३१.३७ च्या सरासरीने ३,०१२ धावा फटकावल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने ८५ सामन्यांमध्ये सात अर्धशतकांच्या सहाय्याने १५४८ धावा जमवल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@