'मेगाब्लॉक'मुळे डोंबिवली-दिवा प्रवाशांचे 'मेगाहाल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |


asfdg_1  H x W:

 


ठाणे : नाताळची सुट्टी साधून मध्य रेल्वेने बुधवारी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करणार असल्यामुळे मेगाब्लॉक जाहीर केला होता. मेगाब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान बंद राहणार होती. परंतु, याचा जबरदस्त फटका चाकरमान्यांना बसला. डोंबिवली आणि दिवा स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.

  

संतप्त प्रवाशांनी रेल्वेवर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीमधून मुंबईकडे जाणारी एकही लोकल नसल्यामुळे स्थानकावर तुफान गर्दी झाली होती. मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका डोंबिवली आणि त्यापुढील प्रवाशांना बसल्याचे चित्र दिसत होते. डोंबिवली स्थानकात गर्दी झाल्यामुळे स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर प्रवाशांनी गोंधळ घातला होता. मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या लोकल नसल्याने प्रवासी संतप्त झाले होते. बराच वेळ लोकल नसल्याने दिवा स्थानकातदेखील प्रवाशांनी गोंधळ घातला.

@@AUTHORINFO_V1@@