आता 'युटर्न' नाही 'उद्धवजी टर्न' : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली दोन लाखांची कर्जमाफी हे आनंदी बाब आहे. पण, ही फक्त फसवणूक आहे, अशी टीका भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. "सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरुन यु-टर्न मारला आहे." अशी टीका त्यांनी केली.

 

"कर्जमाफीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युटर्न मारला आहे. आता 'यु-टर्न'ला 'उद्धवजी टर्न' म्हंटले तर वावगे ठरणार नाही. ते प्रत्येक निर्णयांवर युटर्न मारतात. सत्तेत आल्यानंतर मर्यादा असतील हे मान्य. पण, त्यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण २००१ ते २०१६ या कालावधीतील २ लाखापर्यंतचे कर्ज असलेला शेतकरीच कर्जमाफी देण्यासाठी राहिलेला नाही. आता फक्त २ लाखावरचे शेतकरी राहिले आहेत आणि यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे निव्वळ फसवणुक आहे,” अशी टीका चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

@@AUTHORINFO_V1@@