गूड न्यूज ! रत्नागिरीच्या गावखडी किनाऱ्यावरुन कासवाची पिल्ले समुद्रात रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019   
Total Views |

tiger_1  H x W:

 

 

'आॅलिव्ह रिडले' कासवाच्या ११८ पिल्ल्लांची समुद्रात पाठवणी


मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकण किनारपट्टी ही सागरी कासवांच्या विणीचा हंगामाच्या प्रतिक्षेत असतानाच आज सकाळी रत्नागिरीच्या गावखडी किनारपट्टीवरून कासवाची ११८ पिल्ले समुद्राकडे रवाना झाली. यंदाच्या मोसामातील 'सागरी कासव संवर्धन मोहिमे'अंतर्गत समुद्रात सोडण्यात आलेली ही पहिलीची पिल्ले ठरली आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही पिल्ले नैसर्गिकरित्या म्हणजेच मादीने अंडी दिलेल्या जागीच 'इन-सेतू' पद्धतीने परिपक्व झाली. या घटनेमुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना 'कासव महोत्सवा'चे वेध लागले आहे.

 

tiger_1  H x W: 
 

राज्याच्या किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर दरवर्षी सागरी कासवांची विण होते. समुद्री कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या या किनाऱ्यांवर अंडी देण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा विणीचा महत्वपूर्ण हंगाम आहे. साधारण एक मादी कासव किनाऱ्यावरील वाळूत खड्डा करुन त्यामध्ये १०० ते १५० अंडी घालते. या अंड्यांमधून ३५ ते ४५ दिवसांनंतर पिल्ले बाहेर पडतात. गेल्या महिन्याभरात रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी आणि वेळासच्या किनाऱ्यावर कासवांची अंडी आढळून आली आहेत. आज मात्र, गावखडीच्या किनाऱ्यावर कासवांची पिल्लेच आढळून आली. येथील कासव संवर्धनाचे काम करणारे कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांना सकाळी कासवाची ११८ पिल्ले समुद्राच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसली.

 
 
 

२ नोव्हेंबर रोजी आम्हाला किनाऱ्यावर मादी कासव येऊन गेल्याचे निशाण आढळले होते. मात्र, पाऊस पडल्याने तिने अंडी नेमकी कुठे दिली याचा पत्ता लागला नव्हता, असे डिंगणकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले. आज सकाळी डिंगणकर किनाऱ्यावर गेले असताना त्यांना कासवाची पिल्ले समुद्राकडे जाताना दिसली. ही पिल्ले 'इन-सेतू' पद्धतीने परिपक्व झाली आहेत. मादीने अंडी दिलेल्या जागीच ती परिपक्व झाल्यास त्याला 'इन-सेतू' म्हटले जाते. देशभरात 'सागरी कासव संवर्धन मोहिम'अंतर्गत मादी कासवाने किनाऱ्यावर दिलेल्या जागेवर अंडी ठेवली जात नाहीत. कारण, त्यांना भरतीच्या पाण्याचा आणि इतर शिकारी पशु-पक्ष्यांचा धोका असतो. त्यामुळे ही अंडी कृत्रिमरित्या तयार केलेल्या खड्यात (घरट्यात) हलवली जातात. गावखडीमध्ये कासव संवर्धनाचे काम वन विभाग, ‘निसर्गयात्री’ संस्था आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने पाहिले जाते.



@@AUTHORINFO_V1@@