कोण असेल भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'

    24-Dec-2019
Total Views | 120


cds_1  H x W: 0


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) या ‘फोर स्टार जनरल’ दर्जाच्या पदास मंजुरी दिली असून तो मिलिटरी अफेअर्स (सैन्य विभागाचा) प्रमुख म्हणून काम पाहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना त्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे आता देशास पहिला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मिळणार आहे. लष्कर, नौदल अथवा हवाईदलातून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ निवडला जाणार असून त्याचे वेतन तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखाएवढेच असेल, असे जावडेकर यांनी सांगितले. भारतास चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असावा, ही मागणी कारगील युद्धापासुन होत होती. त्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीनेही तशी शिफारस केली होती. तिन्ही सैन्यदलांमध्ये समन्वय राखणे, मोहिमांच्यावेळी एकत्रित निर्णय घेणे आणि संरक्षण संबंधित विषयांवर सरकारला सल्ला देणे अशा जबाबदाऱ्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावरील अधिकाऱ्यावर असणार आहेत.



भारतासमोरील संरक्षणविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय असावा या उद्देशाने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे पद डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेयर्सच्या कार्यक्षेत्रात येईल आणि तिन्ही दलांचा सैन्य कारभार व्यवस्थापित करण्यासाठीची कौशल्ये या व्यक्तीकडे असतील. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे तिन्ही दलांच्या प्रमुखासोबतच संरक्षणमंत्र्यांचे प्रमुख लष्कर सल्लागार म्हणून काम करतील. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर फोरस्टार जनरल असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक होईल आणि सीडीएसची मुदत संपल्यानंतर ती व्यक्ती कोणत्याही सरकारी कार्यालयात काम करण्यास पात्र ठरणार नाही. त्याशिवाय त्यांना सीडीएसच्या पदावरुन काढून टाकल्यानंतर पूर्वपरवानगी शिवाय पाच वर्षे कोणतीही खासगी नोकरी करता येणार नाही.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121