'पंगा' क्वीन कंगना !

    24-Dec-2019
Total Views |

k_1  H x W: 0 x



वाद आणि बॉलीवूड हे तसं एक समीकरणच. परंतु सतत नवनवीन वादांमुळे प्रकाशझोतात राहणारी अभिनेत्री म्हणून कंगना राणावत हे नाव प्रसिध्द आहे. वादांसोबतच कंगना तिच्या अभिनयामुळेही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे.


पण या कंगनाने यावेळेस अनोखा 'पंगा' घेतला आहे.
कंगनाने घेतलेला हा 'पंगा' अनेकांना नवा आशेचा किरण देणारा ठरत आहे. कंगनाचा हा 'पंगा' म्हणजे तिचा आगामी चित्रपट. अश्विनी अय्यर तिवारीच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'पंगा' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये नोकरी, घर, कुटुंब, मुलगा, पती अशा प्रत्येकांसाठी स्वतःच्या आयुष्यातील जवळपास सर्वच क्षण खर्ची घालणाऱ्या मध्यमवयीन विवाहितेची भूमिका कंगनाने साकारली आहे.




मुळची कबड्डीपटू असणारी 'जया', वैवाहिक जीवनानंतर कशा प्रकारे स्वत:ला इतर काही जबाबदाऱ्यांमध्ये बांधून घेते आणि तिची स्वप्न कशा प्रकारे दूरावतात याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. स्वप्न दुरावली असली तरीही त्यांच्यामागे धावण्याची जिद्द मात्र अद्यापही कायम असल्यामुळे वयाच्या ३२व्या वर्षी ही जया राष्ट्रीय कबड्डी संघात स्वत:चं स्थान मिळवण्याच्या प्रयत्नांत झोकून देते. तिची हीच जिद्दीची गाथा या चित्रपटातून पाहता येणार आहे. कंगनासह या चित्रपटात अभिनेता जेसी गिल आणि अभिनेत्री नीना गुप्ता मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.