परेश रावल पुन्हा करणार 'हंगामा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |

hungama_1  H x



अनेक चर्चा आणि अफवांना पूर्णविराम देत दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अखेर 'हंगामा २' च्या सिक्वेलची घोषणा केली. मंगळवारी चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मिडीयावरून प्रदर्शित करत त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली.


'हंगामा २'मध्ये परेश रावलसह अभिनेत्री शिल्पा शेट्टी, प्रणिता सुभाष, आणि मिझान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच वर्षांनी शिल्पा शेट्टी या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मिझान जाफरी हा अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा असून तो याआधी 'मालाल' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता.




 

येत्या नवीन वर्षात १४ ऑगस्ट २०२०ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'अनलिमिटेड कन्फ्युजनसाठी तयार आहात का, असं म्हणत अभिनेता परेश रावल यांनी या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून प्रदर्शित केले. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय खन्ना, रिमी सेन, परेश राव, आफताब शिवदासानी अभिनित लोकप्रिय विनोदी चित्रपट 'हंगामा'चा हा सिक्वेल असणार आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@