प्रियांका, सोनिया आणि ओवीसींविरोधात खटला दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात भडकावू भाषणे केल्याबद्दल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधीं, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि पत्रकार रविश कुमार यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. अॅड. प्रदीप गुप्ता यांनी अलिगड न्यायालयात हा खटला दाखल केला. न्यायालयाने खटला स्विकारली असून यावर २४ जानेवारी २०२० रोजी सुनावणी होणार आहे.

 

४ डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मंजुरी मिळाली. यामुळे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदू, शिख, जैन, ख्रिश्चन, पारशी आणि बौद्ध लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. विरोधी पक्षातील नेते आणि काही पत्रकारांनी या कायद्याबाबत भडकावू भाषणे केली होती. त्यामुळे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

@@AUTHORINFO_V1@@