बॉडीबिल्डर संग्राम चौघुलेची रुपेरी पडद्यावर एंट्री!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |

dandam_1  H x W


शरीर सौष्ठव स्पर्धेत मिस्टर युनिव्हर्स हा किताब पटकावलेला संग्राम चौगुले लवकरच दंडमया चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता.


दंडमची कथा बीड सारख्या ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या कलेक्टरवर आधारित आहे. एक सरकारी अधिकारी आपले अधिकार वापरू लागला तर केवढा बदल तो घडवू शकतो हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारे हे कथानक तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.




तेलगू आणि तामिळ या दोन भाषेत डब केला जाणारा दंडम हा पहिला मराठी चित्रपट आहे. प्रसेनजीत कोसंबी, जसराज जोशी, आदर्श शिंदे, जुईली जोगळेकर, आनंदी जोशी यांनी दंडम चित्रपटातील गाणी गायली आहेत. व्ही सत्तू यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. मात्र काही वादांमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. आता हा चित्रपट येत्या २७ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@