संवेदनशीलता भाग - ७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |

aarogya_1  H x



होमियोपॅथिक चिकित्सक जेव्हा आरोग्याचा संरक्षक (Preserver of health) म्हणून जबाबदारी पार पाडत असतो, त्यावेळी रुग्णाची नॉर्मल संवेदनशीलता टिकवून ठेवणे, हे त्याच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते. कारण, आजारपणात ही संवेदनशीलता अतिशय नाजूक झालेली असते व तिला अजून धक्का पोहोचेल, असे काहीही न करणे हे उपचारांच्या दरम्यानचे उद्दिष्ट असते. कारण, आजाराच्या दरम्यान कमी अगर जास्त प्रमाणात उद्दिपीत झालेल्या संवेदनक्षमतेमुळेच विविध लक्षणे शरीर व मनामध्ये दिसून येतात व त्याचा उपयोग होमियोपॅथिक चिकित्सकाला त्या रुग्णाचे औषध शोधताना होतो. औषध देताना महत्त्वाचे असे हेच पाहायचे असते की, दिलेले औषध हे बदललेल्या संवेदनशीलतेला पूरक असे आहे की नाही.


निरीक्षणात असे आढळते की
, बरेच वेळा जी औषधे रुग्णांना दिली जातात ती, संवेदनशीलतेचा अभ्यास न करता दिली जातात व ती पूरक नसतात. अनेक प्रकारची औषधी रसायने, जी काही इतर औषधी पद्धतींमध्ये वापरली जातात, ती मुखावाटे किंवा इंजेक्शनच्या रूपात रक्तामध्ये मिसळली जातात, त्या औषधांचा व संवेदनशीलतेचा काही परस्पर संबंध नसतो, सरसकट सर्वांनाच ती औषधे दिली जातात. परंतु, अशा औषधांमुळे शरीराची मूळ संवेदनशीलता बिघडते व नॉर्मल न होता अजून कमकुवत होते. या औषधांच्या मार्‍यामुळे त्यावेळी रुग्णाला असे भासते की, तो बरा झाला. परंतु, नंतर त्यांच्या लक्षात येते की, शरीर अजूनच अशक्त झालेले असते. विनाकारण लहानसहान आजारांमध्येसुद्धा हल्ली अतिशय प्रखर शक्तीची प्रतिजैविके दिली जातात. या प्रतिजैविकांमुळे रुग्णाला असे वाटते की, तो लवकर बरा होतोय.


परंतु
, प्रत्यक्षात मात्र स्वत:च्याच हाताने तो स्वत:ची शक्ती कमी करत असतो व अजून कमकुवत होत असतो. कारण, ही प्रतिजैविके देताना रुग्णाची संवेदनशीलता पूर्णपणे डावलली गेलेली असते आणि त्याचमुळे मग आजार बरा न होता दाबला जातो. अशी औषधे घेताना त्वरित बरे वाटले पाहिजे, हा रुग्णाचा कयास असतो. परंतु, त्यासाठी अजाणतेपणी तो स्वत:च्या शरीराची हानी करून घेत असतो. आरोग्य टिकवण्यात ही औषधे मग कुचकामी ठरतात. कारण, जोपर्यंत चैतन्यशक्तीचा प्रवाह आरोग्यदायी होत नाही व नैसर्गिकरित्या जोपर्यंत तो प्रवाह शरीरात फिरत नाही, तोपर्यंत माणसाचे आरोग्य चांगले झाले, असे आपण म्हणू शकत नाही. या प्रकारच्या प्रखर औषधांनी चैतन्यशक्ती अतिशय कमजोर होते व रुग्णाची नेहमीची ऊर्जाच निघून जाते व तो अशक्त वाटू लागतो.


चिकित्सकाचे कार्य हे नुसती आजारांची लक्षणे घालवणे हे नसते तर
, आजार बरा झाल्यावर आरोग्यदायी वातावरण कसे निर्माण होईल व ते कसे टिकवता येईल, याकडे लक्ष देऊन ते कसे प्रत्यक्षात येईल हे पाहणे गरजेचे असते, नाही तर अशा प्रकारच्या ‘त्वरित बरे वाटते’ असा भ्रम निर्माण करणार्‍या औषधांमुळे संवेदनशीलता दाबली जाते व पर्यायाने मग रोगदमन (suppression) होते व रुग्णाच्या आरोग्याचा आलेख हा खालावत जातो व आधीच्या परिस्थितीपेक्षा बिकट परिस्थिती निर्माण होऊन आजार हा असाध्य होतो. या विषयीची जनजागृती फार गरजेची आहे. परंतु, औषधे बनविणार्‍या कंपन्यांची लॉबी इतकी सशक्त आहे की, खरी माहिती सामान्यांपर्यंत येऊच दिली जात नाही. असो.

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@