पुन्हा एकदा विस्तार लांबणीवर ; काँग्रेसची यादीच तयार नाही?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. यावेळी काँग्रेसची यादीच तयार नसल्यामुळे विस्ताराला उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, अद्याप काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी अंतिम न झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामाना'तून ३० डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे.

 

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी करण्याची लगबग सुरू होती. परंतु, काँग्रेसच्या मंत्र्याच्या यादीचा घोळ अद्याप सुरू आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. परंतु, केवळ अशोक चव्हाण यांचाच मंत्रिमंडळात समावेश होणार असून, पृथ्वीराज चव्हाणांना मात्र या यादीतून वगळण्यात आले आहे. अद्याप अधिकृत माहिती समोर अली नसून लवकरच आम्ही विस्ताराबाबत माहिती देऊ असे वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@