धोनी पुन्हा एकदा कर्णधार... क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. २०१० ते २०१९ या दशकात सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी संघामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळते. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे दिले आहे. तसेच, कसोटी संघाची जबाबदारी विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहे.

 

विशेष म्हणजे एकदिवसीय संघात मिचेल स्टार्कचा अपवाद वगळता एकाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संधी मिळालेली नाही. ज्येष्ठ पत्रकार मार्टिन स्मिथ यांनी 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या दशकातील सर्वोत्तम संघाची निवड केली. त्यांनी या संघात भारताचे धोनी, रोहित आणि विराट या खेळाडूंचा समावेश केला आहे. तर आफ्रिकेचे दोन, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी एक खेळाडू निवडले आहेत.

 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा दशकातला सर्वोत्तम एकदिवसीय संघ

 

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), रोहित शर्मा, हाशिम आमला, विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, शाकीब अल-हसन, जोस बटलर, राशिद खान, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट आणि लसिथ मलिंगा

 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा दशकातला सर्वोत्तम कसोटी संघ

 

अ‍ॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, डेल स्टेन, नॅथन लॉयन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड

@@AUTHORINFO_V1@@