हे भाई लोकांचं सरकार - किरीट सोमय्या

    24-Dec-2019
Total Views |

kirit_1  H x W:


मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या हिरामणी तिवारी याला शिवसैनिकांनी चोप देत त्यांचे केसही कापले. ही घटना वडाळा परिसरात रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली.


शिवसैनिकांचा उद्दामपणा ! मुख्यमंत्र्याबद्दल पोस्ट टाकल्याने जबरदस्ती केले मुंडन

मंगळवारी पोलीस ठाण्यात धाव घेत किरीट सोमय्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी राज्यात भाईलोकांचे सरकार आहे, भाईगिरी सुरूच आहे अशी प्रतिक्रिया देत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना 'नागपुरात महापौरांवर गोळीबार होतो, राजकीय नेत्यांना धमक्या दिल्या जातात. अशाप्रकारे एखाद्याचं मुंडण केलं जातं. ही भाईगिरीच सुरु आहे. त्यामुळे जनतेला हिम्मत देणं हे आमचं काम आहे,' असे ते म्हणाले.