म.रे. वर बुधवारी जम्बो ब्लॉक ; ५ तासांसाठी वाहतूक बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या सुट्टीदिवशी मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर बुधवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सुट्टीदिवशी येणाऱ्या या जम्बोब्लॉकमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९.४५ मिनिटे ते १.४५ मिनिटे या कालावधीत ४०० मॅट्रिक टन वजनी ६ मीटर रूंदीचे ४ गर्डर उभारण्यात येणार आहेत. त्यांमुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पूर्ण ५ तास बंद राहणार आहे. शिवाय एकूण १६ एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात येणार आहे.

 

२५ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या एक्सप्रेस

 

> ११००९-११०१० सीएसएमटी-पुणे सिंहगड

 

> १२१२३-१२१२४ सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन

 

> १२१०९-१२११० सीएसएमटी-मनमाड पंचवटी

 

> २२१०१-२२१०२ सीएसएमटी-मनमाड राज्यराणी

 

> १२०७१-१२०७२ दादर-जालना जनशताब्दी

 

> ११०२९-११०३० सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी

 

> ५११५३-५११५४ सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर

@@AUTHORINFO_V1@@