सलग चौथ्या वर्षी ३० पेक्षा जास्त विजय ; भारतीय संघाची कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर मात करून २०१९ या वर्षाचा शेवट गोड केला. याचसोबत भारताने विंडीजविरुद्धची मालिकाही जिंकली. यातूनच भारतीय संघाच्या नावे आता २०१९ च्या कॅलेंडर वर्षात तिन्ही फाॅरमॅटमध्ये म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये सर्वाधिक ३५ विजयांची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिल्या क्रमांकाचा संघ ठरला आहे.

 

भारतीय संघाने सलग चौथ्या वर्षी सत्रात सर्वाधिक विजयांची नोंद करण्याचा पराक्रम गाजवला. भारताने यापूर्वी २०१८, २०१७ आणि २०१६ मध्येही अशीच सर्वाधिक विजयांची कामगिरी केली होती. भारताने यंदाच्या सत्रात ७ कसोटी, १९ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने जिंकले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३० विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

 

भारतीय संघाने सत्रात एकूण ८ कसोटी सामने खेळले. यात सर्वाधिक ७ विजयांसह भारतीय संघ अव्वल ठरला. यातील एक कसोटी सामना अनिर्णीत राहिला. १ जानेवारी २००० पासून आतापर्यंत एकंदरीत नोंदीवर नजर टाकली असता भारतीय संघ विजयात दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तिन्ही फाॅरमॅटच्या ८४७ सामन्यांत सर्वाधिक ५२७ विजयांसह अव्वल स्थानावर आहे.

@@AUTHORINFO_V1@@