डाॅ. राजू कसंबे ३३ व्या 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'चे अध्यक्ष ; रेवदंड्यात संमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |

tiger_1  H x W:


११ व १२ जानेवारी, २०२० रोजी रेवदंडा (अलिबाग) येथे संमेलन

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना' आणि 'अमेझिंग नेचर' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ३३ व्या 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध पक्षी अभ्यासक आणि लेखक डाॅ. राजू कसंबे यांची निवड करण्यात आली आहे. ११ व १२ जानेवारी, २०२० रोजी रेवदंडा (अलिबाग) येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाला देशभरातून मोठ्या संख्येने पक्षी तज्ज्ञ आणि अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. संमेलनासाठी नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील वनपाल अशोक काळे नाशिक ते रेवदंडा सायकलयात्रा करणार आहेत.

 

महाराष्ट्र पक्षीमित्रहे पक्षीमित्रांचे संघटन व सातत्याने होणारे पक्षीमित्र संमेलन हे महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. देशात असे संघटन वा असे संमेलन होणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य. महाराष्ट्रभर विखुरलेले पक्षीमित्र, पक्षीनिरीक्षक, पक्षीअभ्यासक आणि पक्षीतज्ज्ञ हे या संमेलनाचे खांब आहेत. ही मंडळी संख्यात्मक पातळीवर कमी असली, तरी ती गुणात्मक आहेत. राज्यभरातील ही सर्व मंडळी एकत्र जोडली गेली आहेत तीमहाराष्ट्र पक्षीमित्रया एका व्यासपीठावर. पक्ष्यांचा अभ्यास, संवर्धन व संरक्षणाचा ध्यास घेतलेली आणि आपापल्या ठिकाणी कार्यरत राहून महाराष्ट्र पक्षीमित्रशी जोडलेले पक्षीमित्र हे या संस्थेचे जाळे व पाळेमुळे आहेत. संघटनेतर्फे दरवर्षी आयोजित केले जाणारे पक्षीमित्रांचे संमेलन यंदा अलिबाग येथील रेवदंडा याठिकाणी होणार आहे. यंदा संमेलनाचे ३३ वे वर्ष असून 'अमेझिंग नेचर'या संस्थेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आणि प्रसिद्ध पक्षी अभ्यासक डाॅ. राजू कसंबे यांची निवड करण्यात आली आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 

गेल्या २२ वर्षांपासून डाॅ. कसंबे हे पक्षी अभ्यास व संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत. १८ वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी 'थ्री इडियट्स' चित्रपटावरुन प्रेरणा घेऊन नोकरीचा राजीनामा दिला. २०१० साली मुंबईला 'बॅाम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' या जगप्रसिद्ध संस्खेत ते पक्षीशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. सध्या ते या संस्थेत ;सहाय्यक संचालक; (शिक्षण) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.एस्सी. साठी निळ्या-शेपटीच्या राघुंवर, एम.फील. साठी गोरेवाडा (नागपूर) येथील फुलपाखरांवर आणि पीएच.डी. करिता भारतीय राखी धनेश पक्ष्यावर संशोधन केले आहे. आज डॅा. कसंबे यांच्या नावावर १३ पुस्तके, १०० पेक्षा अधिक शास्त्रीय निबंध आणि अनेक मराठी लेख आहेत. त्यांनी महाराष्ट्रात आढळणाऱ्या ५७७ पक्षी प्रजातींच्या मराठी भाषेतील नावांचे प्रमाणीकरण केले आहे. तसेच याठिकाणी आढळणाऱ्या १७७ प्रजातींच्या फुलपाखरांचे मराठी भाषेत नामकरण केले आहे.

 
 

संमेलनाला सायकलवरुन पोहचणार...

पर्यावरणपूर्वक 'सायकल' हे पक्षी मित्रांचे वाहन व्हावे हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याकरिता वर्धा ते रेवदंडा , नवी मुंबई ते रेवदंडा , अलिबाग ते रेवदंडा सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील वनपाल अशोक काळे हे पाणथळ जागांचे संवर्धन, पक्षिसंवर्धन लोकचळवळ व्हावी तसेच पाणथळीतून जैवविविधता जतन व्हावी यासाठी नाशिक ते रेवदंडा सायकल यात्रा करणार आहेत. ९ जानेवारी रोजी ते नाशिकहून सुरुवात करून, ११ तारखेला वर्धा ते रेवदंडा सायकल यात्रा करणारे दिलीप विरखेडे यांचे ग्रुप समवेत संमेलनस्थळी दाखल होतील. नोंदणीसाठी कृपया 9967569570 वर संपर्क साधावा किंवा ईमेल करा[email protected]

 
 
@@AUTHORINFO_V1@@