मंत्रिपदांवरून अजूनही महाविकासअघाडीत संभ्रम ? ठाकरे सरकारचे ठरेना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019
Total Views |


safs_1  H x W:

 


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकासाआघाडीचे सरकार प्रस्थापित झाले. परंतु, महिना संपत आला तरी अजूनही मंत्रिमंडळाच्या खुर्च्या रिकाम्याच आहेत. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. कोणते पद कोणाला मिळणार याबाबत अजूनही महाविकासआघाडीमध्ये संभ्रम आहे. विस्तारासाठी ठाकरे सरकार आणि महाविकासआघाडीमध्ये अनेक समस्या आहेत.

 

सध्या मंत्रिमंडळामध्ये २ चव्हाणांमध्येच शर्यत लागली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाण यांची वर्णी लागणार अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. परंतु, पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात जागा मिळेल की नाही याबाबत अजूनही काँग्रेस पक्षाचा विचार नक्की नाही. या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात कसे समाविष्ट करायचे याचा पेच होता. काँग्रेसचे हे दोनही माजी मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक लढले. अशोक चव्हाण लोकसभेला पराभूत झाले, पण विधानसभेत जिंकले. तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेचा आग्रह नाकारत विधानसभेच्याच निवडणुकीला प्राधान्य दिले.

 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये आणखी एक नवा वाद तो म्हणजे ज्येष्ठ आणि तरुण यांच्यामधला आहे. काँग्रेस हायकमांड विस्तारासाठी ज्येष्ठ नेते मंडळींची यादी तयार करत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर काँग्रे, राष्ट्रवादीच्याच तरुण नेत्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी करत असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे, राज्यात सामाजिक आणि भौगोलिक समतोल राखण्यासाठी काँग्रेसकडून विविध घटकांना मंत्रिपदांमध्ये समान वाटा मिळेल यासाठी विचार केला जात आहे असेदेखील सांगण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@