१५ वर्षांपूर्वी झाली 'धोनी'पर्वाची सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


लांब केस, फलंदाजी करण्यासाठी उभा राहण्याची वेगळी शैली आणि बाद झाल्यावरदेखील डोळ्यांमध्ये समुद्रासारखी शांतता. अशी काहीशी पहिल्याच क्षणी महेंद्र सिंग धोनीची झालेली ओळख. १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २३ डिसेंबर २००४मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळाला होता. सातव्या क्रमांकावर आलेल्या धोनीने पहिल्याच सामन्यामध्ये एकही धाव न करता धावचीत झाला. त्या मालिकेमध्ये धोनी चांगला खेळू शकला नाही. मात्र, त्यानंतर त्याच्या फर्स्ट क्लास क्रिकेटच्या त्याच्या कामगिरीवर आणि कर्णधार सौरभ गांगुलीच्या भरोशावर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली.

 

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेमध्ये त्याने केलेल्या खेळीनंतर धोनीला देशभरात प्रसिद्धी मिळाली. त्याने पाकिस्तानच्या विरुद्ध ५व्या निर्णायक एकदिवसीय सामन्यामध्ये गोलंदाजांची शाळा घेत १२३ बॉलवर १४८ धावांची खेळी केली. त्यानंतर धोनीने कधी मागे वळून पहिले नाही आणि 'धोनी' पर्वाची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर धोनीने अनेक विक्रम रचले आणि जगातील क्रिकेटच्या इतिहासामध्ये स्वतःचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले. धोनीच्या नावावर असलेल्या विक्रमांची यादी तशी खूप मोठी आहे. परंतु, त्याचे असे काही विक्रम ज्यांनी भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या स्थानावर पोहचविले.

 

'धोनी'पर्वाची कामगिरी

 

> वर्ष २००७मध्ये महेंद्र सिंग धोनीने पहिल्यांदा भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व केले आणि पहिला टी- २० विश्वचषक जिंकून दिला

 

> २८ वर्षांनंतर धोनीच्या नेतृत्वाखाली २०११मध्ये आयसीसी विश्वचषक भारताच्या नावे केला

 

> २०१३मध्ये धोणीच्याच नेतृत्वाखाली भारताने चैम्पियंस ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि सलग तिन्ही आयसीसी ट्रॉफीनवर नाव कोरणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला

 

> आयपीएलमध्ये धोनीने ९ वर्ष चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व केले आणि ३ वर्ष आयपीएल ट्रॉफीदेखील जिंकून दिली

 

> २०१० आणि २०१४ या दोन्हींवर्षी धोनीच्या भारतीय संघाने चैम्पियंस लीग टी-२० खिताब नावावर केला

 

> आतापर्यंत धोनीने एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,७७३ धावा केल्या असून यष्टींमागे ४४४ जणांची शिकार केली आहे

 

> टी-२० सामन्यांमध्ये १,६१७ धाव केल्या आहेत तर यष्टींमागे ९१ विकेट्स घेतल्या आहेत

 

> एकदिवसीय आणि टी-२०सहित धोनीने ४,८७६ धावा केल्या असून यष्टींमागे २९४ बळी टिपले आहेत

 

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीच्या १५ वर्षपूर्तीसाठी ट्विटरवर #15YearsofDhonism हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे

 
@@AUTHORINFO_V1@@