सलग १० एकदिवसीय मालिका जिंकत भारताचा नवा विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : कर्णधार विराट काेहलीच्या ८५ धावा, राेहित शर्माच्या ६३ धावा आणि लोकेश राहुलच्या ७७ धावांच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने विंडीजवर मालिका विजयाची नोंद केली. भारताने तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात विंडीजवर ४ विकेट्सनी मात केली. यासह भारताने घरच्या मैदानावरील तीन एकदिवायीय सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली. या मालिका विजयासह भारताने सलग १० एकदिवसीय मालिका विजयाची नोंद केली आहे.

 

वेस्ट इंडिजला २००७ पासून ते आतापर्यंत भारताविरुद्ध एकही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. या विक्रमासह भारतीय संघाने एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक सलग मालिका विजयाचा विक्रम नावावर करताना स्वतःचाच विक्रम मोडला. यापूर्वी भारताने २००५ पासून श्रीलंकेविरुद्ध सलग ९ एकदिवसीय मालिका जिंकल्या होत्या. तसेच, या विजयासह भरताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची भारतीय संघाची ही १९वी वेळ ठरली.

 

रोहित विराटाचेच वर्ष २०१९

 

या सामन्यामध्ये रोहित शर्माने ६३ धावांची खेळी केली. तसेच, कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची ढाकेदार खेळी केलं. याचसोबत या दोंघांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलामीवीर रोहित शर्माने वर्षभरात १४९० धावा केल्या आहेत, तसेच विराटने वर्षभरात १३७७ धावा केल्या आहेत. वर्षभरात सर्वाधिक धाव करणाऱ्यांमध्ये रोहित पहिल्या तर विराट दुसऱ्या स्थानी आहे.

 

मात्र २०१९ या वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये (म्हणजे एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने पहिले स्थान पटकावले आहे. केवळ ६ धावांनी रोहित दुसऱ्या स्थानावर फेकला गेला. सर्व फॉरमॅटमध्ये विराटच्या नावावर एकूण २४४७ धाव जमा आहेत. तर, रोहितच्या नावावर २४४२ धावा जमा आहेत.

@@AUTHORINFO_V1@@