हिवाळ्यातील लसीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019
Total Views |

AAROGYA_1  H x



प्रौढांसाठी काही मार्गदर्शक सूचना


हिवाळ्याचे दिवस आपल्यासोबत थंडी व धुरकेही घेऊन येतात आणि त्यामुळे अर्थातच या दिवसांत जंतूसंसर्गाच्या घटना वाढीस लागतात
. या संसर्गाची लागण वयोवृद्ध मंडळी, लहान मुले, गरोदर स्त्रिया तसेच एखादा इतर मूळचे आजार असलेल्या व्यक्तींना विशेषत्वाने होते. यापैकी लहान मुलांसाठीचे लसीकरण सर्वज्ञात आहे आणि देशभरात ते मोठ्या काटेकोरपणे अमलातही आणले जाते. पण, तितकेच लक्ष प्रौढांसाठीच्या लसीकरणावरही केंद्रित करण्याची गरज आहे.


प्रत्येक व्यक्तीने पुढील लसी टोचून घ्यायला हव्यात

फ्लूसाठीची लस : फ्लूसाठीच्या लसीचा प्रभाव घेतल्यावर जेमतेम वर्षभर टिकतो. फ्लूवरील लसीमुळे तुम्हाला हिवाळ्यात सर्दी किंवा खोकला गाठणारच नाही, असे नाही. मात्र, तो वारंवार होणे मात्र नक्की टळेल. तसेच, या लसीमुळे या आजारांची तीव्रता कमी होईल. फ्लू सर्वसाधारणपणे प्राणघातक आजार मानला जात नाही, पण काही परिस्थितींमध्ये तो प्राणघातक ठरू शकतो. तसेच या तापापायी कामावरून रजा घ्यावी लागत असल्याने तो अत्यंत नकोसा असतो.


न्यूमोनियाची लस : न्यूमोनिया हा फुफ्फुसांना होणारा संसर्ग आहे
. ‘स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनाय’ नावाच्या विषाणूची बाधा हे त्यामागचे सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे कारण आहे आणि हिवाळ्यात हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. सुदैवाने ‘स्ट्रेप-न्यूमोनिया’ला प्रतिबंध करण्यासाठीची लस उपलब्ध आहे.


लसीकरणाची गरज कोणाला
?

फ्लूसाठीची लस कोणाला द्यावी?

  • ६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती
  • अस्थमा किंवा श्वसन यंत्रणेशी संबंधित कोणत्याही प्रकारचा जुनाट आजार असलेल्या व्यक्ती
  • हृदयविकार असलेल्या व्यक्ती
  • अ‍ॅस्पिरीन थेरपीवर असलेली लहान व किशोरवयीन मुले. कारण त्यांना मेंदू व यकृताची हानी करणारा एक आजार होण्याचा धोका अधिक असतो, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्ती, शुश्रूषागृहे किंवा वृद्धाश्रमात राहणार्‍या किंवा इन्फ्लुएन्झा वेगाने पसरू शकेल अशा कोणत्याही ठिकाणी राहणार्‍या व्यक्ती, ‘सिस्टिक फायब्रॉइड्स’ नावाची समस्या असलेल्या व्यक्ती



न्यूमोकोकल जंतूसंसर्गास प्रतिबंध करणारी लस :

  • ६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती
  • ज्या व्यक्तींची प्लीहा (spleen) काढून टाकण्यात आली आहे किंवा ज्यांना प्लीहेशी संबंधित आजार आहे. नेफ्रोटिक सिंड्रोम आणि सिरोसिसच्या रुग्णांसह हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे किंवा यकृताचे दुर्धर दुखणे असलेल्या व्यक्ती, डायबेटिस मेलिटस असलेल्या प्रौढ व्यक्ती, सिकल सेल आजार किंवा रक्ताचा एखादा आजार असलेल्या व्यक्ती, रोगप्रतिकारशक्ती पुरेशी कार्यरत नाही किंवा दडपली गेली आहे, अशा व्यक्ती. यात कोणत्याही टप्प्यावरील एचआयव्ही किंवा एड्सची लागण झालेल्या व्यक्तींचा समावेश आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये कोणत्याही आजारातून गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणूनच त्यांना वैद्यकीय देखभालीची गरजही अधिक असते. यामुळे त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासू शकते.


-डॉ. अनिता मॅथ्यू
(लेखिका फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील सल्लागार चिकित्सक आणि संसर्गजन्य आजारतज्ज्ञ आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@