‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ उक्तीचा ‘क्रिएटिव्ह’ संस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019   
Total Views |

anchor_1  H x W



डोंबिवली : ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’, असे आपण खूप वेळा ऐकले आहे. पण याची प्रचिती खूप कमी वेळा आपल्याला येते. अशीच काहीशी प्रचिती टिटवाळ्यातील काही तरुणांनी दिली आहे. अद्याप गाव-खेड्याने विस्तारलेल्या या भागात काही नागरी सुविधांची वानवा असताना तज्ज्ञ डॉक्टर, एक्सरे, ईसीजी सारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न ‘क्रिएटिव्ह ग्रुप’च्या विक्रांत बापट व त्यांच्या काही मित्रांनी केला आहे.


श्री महागणपती हॉस्पिटलच्या माध्यमातून येथील सुमारे ६७ गावांना वैद्यकीय सेवा देण्याचे मुख्य उद्दिष्ट बाळगत आपले काम त्यांनी सुरू केले
. या कामासाठी हिंदुजा हॉस्पिटल, टिटवाळ्यातील गणपती मंदिरांचे सहकार्य घेत काम सुरू केले. तसेच ही वैद्यकीय सेवा सुरू करून देण्यासाठी टिटवाळ्यातील स्थानिक प्रमोद दलाल यांनी जागा उपलब्ध करून दिली व २००९ साली या रूग्णालयाचा पाया रचण्यात आला.


बापट यांनी आपल्या आईला तसेच काही जवळच्या लोकांना योग्य ती वैद्यकीय सेवा न मिळाल्याने आपला जीव
गमवावा लागल्याचे पाहिले होते. हा अनुभव गाठीशी असताना समाजासाठी काहीतरी चांगले काम करावे, हे ध्येय ठेवत ‘क्रिएटिव्ह ग्रुप’ने हे काम सुरू केले. विक्रांत बापट यांनी या कामासाठी स्वतःला वाहून घेतले व त्यांच्या मित्रांनी आपल्या दैनंदिन कामाबरोबर या कामासाठी आपला वेळ दिला. तसेच आर्थिक हातभारदेखील लावला व गरजूंसाठी अद्ययावत रुग्णालय उभे राहिले. बापट व त्यांच्या मित्रांनी लहानशा दुकानाच्या गाळ्यात काम सुरू केले. क्रिएटिव्ह पॉली क्लिनिक सुरू केले. येथे अल्पदरात रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी व औषधोपचार सुरू झाले.


हळूहळू लोकांचा प्रतिसाद वाढू लागला
. याच दरम्यान सर्वांच्या मनात एका अद्ययावत रुग्णालयाचा विचार आला व २०१२ साली या तरुणांनी श्री महागणपती रुग्णालयाचा शुभारंभ केला. आज हे रुग्णालय सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी तत्पर आहे. रुग्णांच्या सेवेसाठी व देखभालीसाठी येथे २५ डॉक्टर दिवस-रात्र उपलब्ध आहेत. संपूर्ण रुग्णालयात ५० कर्मचारी कार्यरत आहेत आणि संपूर्ण इमारतीची स्वच्छता राखण्यासाठी २५ कर्मचारी कार्यरत आहेत. जगात असे काही लोक असतात, जे क्षमतेपलीकडे जाऊन सार्‍या आव्हानांचा स्वीकार करतात व माणुसकीची पालखी वाहतात.

@@AUTHORINFO_V1@@