का... का... छी... छी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2019   
Total Views |


mamta banrjee_1 &nbs



का च्या पुढे का आणि छी च्या पुढे छी लावून त्या मस्त सूर ताल धरतात
. काय म्हणता, कुणाचे मनोरंजन करायला? कुणाचा बालहट्ट पुरवायला? तर अज्ञानाच्या काळोखात सुख मानणार्‍या कित्येकांना त्यांच्या गाण्याने आनंद वाटतो. काही द्वाड पोराटोरांना त्यांच्या बालगीताने दुप्पट्ट ऊतही येतो. तर अशा या कवयित्री सूरयत्री.



बाजारात मावशीबाईने नवे बालगीत आणले आहे म्हणे
... ऐकले की नाही? वा वा, काय छान सूर ताल आहे. का...का...छी... छी..छी.. का...का...छी... छी... हम से जो ठकरा... ये गा छूर छूर हो जासेगा... (ज जमिनीतला) हेच ते नवे बालगीत. आपल्याकडे नाही का चिऊकाऊच्या गोष्टी सांगतो. तर आता या बंगालच्या मावशीबाई का का छी छी थू थू करत सुरात बोंबलत आहेत. काय तो बाणा, काय तो आवेश!



पण आताशा वाटते की
, मावशीबाईंसाठी दिदी, बानो वगैरे या गोष्टी झूट आहेत. खरे तर त्या बालकविता करणार्‍या, गाणार्‍या एक दर्दी कवयित्री आहेत. का च्या पुढे का आणि छी च्या पुढे छी लावून त्या मस्त सूर ताल धरतात. काय म्हणता, कुणाचे मनोरंजन करायला? कुणाचा बालहट्ट पुरवायला? तर अज्ञानाच्या काळोखात सुख मानणार्‍या कित्येकांना त्यांच्या गाण्याने आनंद वाटतो. काही द्वाड पोराटोरांना त्यांच्या बालगीताने दुप्पट्ट ऊतही येतो. तर अशा या कवयित्री सूरयत्री. या आधीही त्यांची कलाकारी सगळ्या देशाने पाहिलेली. तशा त्याही बालहृदयाच्याच. त्यामुळेच तर त्या बालकांसाठीच्या कविता करू शकल्या.



तर या बालहृदयी मावशीबाईंचे आवडते खेळणे म्हणजे बहुसंख्य हिंदूंच्या भावना
. त्या पायदळी तुडवल्या, त्यांचा अपमान केला की, मावशीबाईतले बालक खुश. कोणी म्हणतं की, नाही नाही हो, त्यांच्यात कसले आले बालकबिलक? त्यांच्यात सैतान असेल. कसे? विचारल्यावर या नतद्रष्टांनी सांगितले की, मागे म्हणे या मावशीबाईंसमोर ‘जय श्रीराम’ म्हटले की त्यांना कसेकसेच व्हायचे. भारी त्रास व्हायचा. असे म्हणतात, हुनमान गुणसागराचे नाव घेतल्यावर भूत-पिशाच्च निकट येत नाही. त्या हनुमानाच्या प्रभूचे म्हणजे प्रभू श्रीरामाचे नाव घेतल्यावर पिसाटल्यासारखे कोण वागेल? सैतानच ना? असो, पण आता या प. बंगालच्या सैतानी मावशीबाई सध्या ‘का का छी छी’ करत बालगीत गात हिंडत आहेत. हे गीत त्यांनी का लिहिले असावे? कदाचित दिल्लीत एक बालक आहे, ते म्हणे सारखं छोटा भीम पाहत असते. त्याला नवीन काहीतरी ऐकायला मिळावे म्हणून तर या मावशीबाईंनी हे बालगीत लिहिले नाही ना? तसे असेल तर ‘आलू से सोना निकलेगा,’ म्हणणारे ‘का का छी छी’ म्हणताना दिसतील आणि सगळा भारत यांची ‘छी थू’करायला एकवटलेला दिसेल.



छी थू
.. छी थू...


मुख्यमंत्री कुणी बनावे
? कुणीही बनावे?

ज्यांना भूगोलाचे ज्ञान नाही, इतिहासाची जाण नाही

देशाचा अभिमान नाही की संस्कृतीचा स्वाभिमान नाही

मुख्यमंत्री कुणी बनावे? कुणीही बनावे...



का
...का...छी... छी.. वरून आपणही कविता करावे, असे वाटले. ही कविता महामहिम मुख्यमंत्री पश्चिम बंगाल यांना सादर समर्पित आहे. या मुख्यमंत्री महोदयांना भूगोलाचे ज्ञान आहे म्हणावे तर त्या मागे म्हणालेल्या याद राखा, कश्मीरला लागून भारताची एकच सीमा आहे. पण प. बंगालला लागून किती तरी परकीय सीमा आहेत. प. बंगालमध्ये जरा काही वेगळं कराल तर या सीमा पेटून उठतील. प. बंगाल हा काही स्वतंत्र देश नाही. तर लोकशाही भारताचे ते एक संविधानिक राज्य आहे. भारतीय केंद्र सरकारच्या अधिपत्याखालचे संविधानयुक्त राज्य. पण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटते की, प. बंगाल एक स्वतंत्र राष्ट्रबिष्ट्रच आहे. प. बंगालची स्वतःची एक अशी अस्मिता आहे. वंगभंगापासून या राज्याने अनेकवेळा आघात सहन केले. 1971 सालच्या पाकिस्तानच्या फाळणीनंतर शरणार्थींच्या लोंढ्याने या राज्यात शब्दातीत बदल झाला. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यातील भेद स्पष्ट झाला. सगळ्या देशाने हे अनुभवले. प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांना प. बंगालचे नाव बांगला करून हवे आहे. बांगलादेशात आणि पश्चिम बंगाल देशात फारसा फरक राहू नये, हाच कुटील डाव असावा का त्यात?



असो
, आता या भारतीय संघराज्याच्या मुख्यमंत्रीबाईंनी एक अजब मागणी केली आहे की, कॅब आणि एनआरसी कायद्यावर सार्वमत घ्यावे, तेही संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली. याचाच अर्थ या मुख्यमंत्री महोदयांचा या देशाचे संविधान, या देशाची लोकशाही, या देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि या देशाच्या संसदेवरही विश्वास नाही. या देशाच्या कोणत्याच संविधानयुक्त घटकांवर या मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही. मात्र, तरीही तिला या देशाच्या संघराज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. भारतीय दैनंदिन कामात संयुक्त राष्ट्राला आणा, हे सांगण्याचे अधिकार या मुख्यमंत्री महोदयांना कोणी दिले? आमचा देश, त्याचे संविधान कोणताही प्रश्न सोडवायला सक्षम आहे. त्यावर अविश्वास दाखविणार्‍या अपात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा निषेध.. निषेध.. त्यांच्याच भाषेत छी... छी... थू. ..थू...!

@@AUTHORINFO_V1@@