बॉलीवूडला पुन्हा एकदा पायरसीचे ग्रहण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |

salman_1  H x W



बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित 'दबंग ३' शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधी गाण्यांमुळे वादात असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३० कोटींचा व्यवसाय केला. प्रभु देवा दिग्दर्शित 'दबंग ३'मध्ये सलमान खानशिवाय सोनाक्षी सिन्हा, डिंपल कपाडिया, सई मांजरेकर, अरबाज खान आणि सुदीप किच्चा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटाला समिक्षकांसह, प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण चित्रपट प्रदर्शनाच्या एका दिवसांतच 'दबंग ३' ऑनलाईन लीक झाला आहे. पायरसी वेबसाइट तमिलरॉकर्सने चित्रपट ऑनलाईन लीक केला आहे.


'दबंग ३'ची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट चांगला चर्चेत होता. मात्र इतर चित्रपटांप्रमाणेच 'दबंग ३'लाही पायरसीचा फटका बसला आहे. तमिलरॉकर्सच्या वेबसाईटवर हा चित्रपट अनधिकृतपणे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.


'दबंग ३'ची कमाई १५० कोटींहून अधिक होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होत होता. गुरुवारी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये 'दबंग ३'ने जवळपास ११.५० कोटींचा गल्ला जमवला होता. पण आता चित्रपट लीक झाल्यानंतर 'दबंग ३'च्या बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तमिलरॉकर्स 'दबंग ३'ची एचडी प्रिंट एका लिंकच्या माध्यमातून डाऊनलोड करण्याचा पर्याय देत आहे. तमिलरॉकर्सकडून केवळ 'दबंग ३' नाही तर इतरही बिग बजेट चित्रपट लीक करण्यात आले होते.

@@AUTHORINFO_V1@@