
नवी दिल्ली : शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध करण्यासाठी राजधानीच्या अनेक भागात तणाव निर्माण झाला होता. कित्येक संघटनांकडून होणाऱ्या निषेधाची हाक पाहता पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहता अनेक भागात कलम १४४ लागू केले आहे. त्याचबरोबर सलग दुसर्या दिवशी १७मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली. पहाटे साडेतीनच्या सुमारास जामा मशिदीबाहेर येताच पोलिसांनी भीम आर्मीप्रमुख 'रावण' उर्फ चंद्रशेखर आझाद याला ताब्यात घेतले आहे. दर्यागंज पोलीस स्टेशन आणि डीसीपी कार्यालयाबाहेर गाडीला जाळून टाकण्यासह तोडफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार इतर कडक कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. काल रात्री ४० जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. पुरावे गोळा केल्यानंतरच या लोकांना अटक करण्यात आली.
काल जामा मशिदीसमोर दिवसभर शांततापूर्ण निषेध नोंदविला गेला पण संध्याकाळी या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. दिल्ली गेटवर जमलेल्या निदर्शकांना हटविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा मारा केला असता त्यांनी दगडफेक सुरू केली. दरम्यान, दर्यागंज पोलिस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या कारला कोणीतरी जाळले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि जामा मशिदीच्या दिशेने जाणाऱ्या निदर्शकांना हटविले. सीमापुरी आणि सीलमपूर भागातील आंदोलकांवर दगडफेक केल्याने अतिरिक्त पोलिस उपायुक्त राजबीर सिंह जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या व्यतिरिक्त 13 पोलिसांसह ४५ आंदोलनकर्तेही जखमी झाले. त्याच वेळी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी ४० जणांना दर्यागंज येथून ताब्यात घेतले. जामिया परिसरात पुन्हा विद्यार्थ्यांकडून निदर्शनास सुरुवात झाली आहे.