भारत-चीन सीमाप्रश्नावर महत्वपूर्ण बैठक सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |


ajit_1  H x W:


नवी दिल्ली : भारत-चीन सीमा विवाद सोडविण्यासाठी विशेष प्रतिनिधींची (एसआर) २२वी बैठक नवी दिल्लीत सुरू झाली आहे. बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ भारताची बाजू मांडतील तर चिनीची बाजू परराष्ट्रमंत्री आणि राज्य सल्लागार वांग यी हे मांडणार आहेत.



ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची अनौपचारिक बैठक आणि बँकॉकमध्ये नुकत्याच झालेल्या आरसेपमधून वेगळे होण्याच्या भारताच्या निर्णयानंतर परराष्ट्रमंत्री वांग यांचा भारत दौरा हा चीनचा पहिला उच्चस्तरीय दौरा असेल. डोभाल आणि वांग हे दोन्ही देशांमधील सीमा प्रश्नांवरील चर्चेसाठी खास नियुक्त केलेले प्रतिनिधी आहेत.



ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी यांच्या दरम्यान झालेल्या शिखर-स्तरीय चर्चेच्या वेळी झालेल्या निर्णयाच्या अनुपालनाचा दोन्ही बाजूंनी विचार करू शकतात
, असे मिळालेल्या माहितीतून कळते. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्येच वांग यी विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेसाठी भारत दौर्‍यावर येणार होते पण हा दौरा पुढे ढकलण्यात आला.



भारत आणि चीनमध्ये ३४८८ कि.मी. वास्तविक नियंत्रण रेषेवर वाद आहे. हा सीमावाद सुटेपर्यंत सीमा भागात शांतता व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे
, असे दोन्ही बाजूंचे मत आहे. त्याच वेळी, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले की, "चीनचे विशेष प्रतिनिधी वांग २१ डिसेंबर रोजी भारताच्या एनएसए डोभाल यांच्याशी २२व्या बैठकीत सीमाप्रश्नी चर्चा करतील. विशेष प्रतिनिधी संवाद हा आमच्यासाठी सामरिक संवादांचे मुख्य माध्यम आणि महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. अधिवेशन म्हणून दोन्ही देश पर्यायी बैठक घेतील. गेल्या वर्षी चीनमध्ये ही चर्चा झाली होती.

@@AUTHORINFO_V1@@