स्वामित्वशून्य उपभोक्त्यांच्या रांगेत अनंत पंढरे उपभोगशून्य स्वामित्वाचे कर्तेपण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : "नेतृत्व व जबाबदारीच्या भानातून संस्थेचे स्वामित्व व्यक्तीकडे येत असते. ते पदाशी नव्हे तर संचालनाच्या प्रमुख भूमिकेशी निगडित असते. तसेच राजा जसा जगाचा उपभोगशून्य स्वामी असतो तसेच हे असते. परंतु, सध्या अशा स्वामित्वशून्य उपभोक्त्यांच्या रांगेत अनंत पंढरे यांच्यासारख्या उपभोगशून्य स्वामित्वाचे महत्त्व कौतुकास्पद व आदर्शवत ठरते," असे प्रशंसोद्गार खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी काढले'आर. जी. जोशी फाऊंडेशन'च्यावतीने गेली २४ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. फाऊंडेशनच्या उपक्रमाचे यंदा पंचविसावे वर्ष होते व यंदा 'आर. जी. जोशी फाऊंडेशन सामाजिक कृतज्ञता निधी' अर्पण कार्यक्रम विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या केशवराव घैसास सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यंदा हा पुरस्कार - निधी औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे संचालक डॉ. अनंत पंढरे यांना देण्यात आला. सदर पुरस्कार सोहळ्यावेळी डॉ. पंढरे यांचे कौतुक करताना डॉ. सहस्रबुद्धे यांनी वरील उद्गार काढले.

 

दरम्यान, यंदा हा सामाजिक कृतज्ञता निधी सुमारे दोन लाख रुपये इतका करण्यात आला असून तो डॉ. अनंत पंढरे यांनी डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सत्काराच्या माध्यमातून स्वीकारला. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, द्रष्टी व्यक्ती एखाद्या कार्यसंबंधाने ध्येयाची मांडणी करतात. परंतू, त्या ध्येयाला आकार देण्याचे काम कर्त्या कार्यकर्त्याला करावे लागते. हा कर्तेपणा हे अनंत पंढरे यांचे वैशिष्ट्य असून त्यांनी ते डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. डॉ. पंढरे यांच्या याच कर्तेपणाला मिळालेला हा पुरस्कार आहेपुढे ते म्हणाले की, अनेकदा सामाजिक संस्था आजारी पडल्याचे वृत्त आपल्यासमोर येत असते. कारण, तिथे सामूहिक जबाबदारी म्हणजे कोणीही जबाबदार नाही, याप्रकारे काम केले जाते. परंतु, डॉ. पंढरे डॉ. हेडगेवार रुग्णालयाची जबाबदारी आपल्या नेतृत्वात समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनी कधीही आपली संस्था आजारी पडेल, असे कृत्य केले नाही व हेच त्यांच्या कर्ता कार्यकर्तेपणाचे वैशिष्ट्य आहे. दरम्यान, डॉ. सहस्रबुद्धे यांनी यावेळी संस्थाशास्त्र, सामाजिक वैद्यकशास्त्र, नेतृत्वशास्त्र, भारतीय रुग्णालयशास्त्र, स्वच्छ रुग्णालय आदी विविध विषयांवर आपले मत मांडले, तसेच या अनुषंगाने डॉ. अनंत पंढरे व डॉ. हेडगेवार रुग्णालयाकडून अपेक्षाही व्यक्त केल्या.

 

'आम्ही जे काम करतोय तेच संघकाम व तीच राष्ट्रसेवा'

 

पुरस्कारमूर्ती डॉ. अनंत पंढरे यांचा बालपणापासून ते डॉ. हेडगेवार रुग्णालय, नाशिकचे श्रीगुरुजी रुग्णालय व आता आसाममध्ये होऊ घातलेल्या रुग्णालयाच्या संबंधाने मनोगत जाणून घेण्यासाठी प्रा. केशव परांजपे यांनी यावेळी दीर्घ मुलाखत घेतली. डॉ. पंढरे यांनी सदर मुलाखतीत अनेक प्रश्नांना दिलखुलास व मनमोकळी उत्तरे दिली. आम्ही उत्तरदायित्वाच्या भावनेतून काम करत आहत. "रुग्णालय चालवण्यासाठी आम्ही कधीही देणगी घेतली नाही तर केवळ प्रोजेक्टबेस म्हणजे उपकरणे, यंत्रसामग्री वा शस्त्रक्रिया यासाठीच देणगी घेतली," असे ते म्हणाले. दरम्यान, "आमचे घर संघाचे होते. संघाशी लहानपणापासूनच संबंध आला व त्या संस्कारातून मी घडलो," असे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@