परीक्षकानंतर आता सूत्रसंचालकही बदलणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |

manish_1  H x W


सध्या इंडियन आयडॉलच्या ११ व्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा गायक-अभिनेता आदित्य नारायणच्या हाती होती, मात्र लवकरच त्याच्या जागी एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागणार आहे. लवकरच आदित्यची जागा मनीष पॉल घेणार आहे.


मनीषच्या आधी जय भानुशालीच्या नावाची चर्चा होती. मात्र आत मनीषच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या आधी अनु मलिकला या कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मीटू मोहिमेअंतर्गत अनु मलिकवर गंभीर आरोप लावण्यात आल्याने त्याला या कार्यक्रमाची परीक्षक खुर्ची सोडावी लागली होती. त्याच्या जागी गायक-अभिनेता हिमेश रेशमियाची वर्णी लागली होती.

@@AUTHORINFO_V1@@