कल्याणात प्रथमच रंगणार “सत्यरंग नाटय महोत्सव २०९९"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |



Kalyan_1  H x W


कल्याण : जेष्ठ रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांच्या स्मृतीदिनानिमित्त, चार मित्र कल्याणने, “सत्यरंग नाटय महोत्सव २०१९" आयोजित केला आहे. “चार मित्र कल्याण" गेले दोन वर्ष कल्याण आणि परिसरात नाटय चळवळ रूजवू पाहत आहे. याच उपक्रमाअंतर्गत या मोहत्सवाचे आयोजन कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे २५ डिसेंबर रोजी केले आहे.


अशा प्रकारचा महोत्सव कल्याण परिसरात प्रथमच आयोजित होत आहे. महोत्सवात दोन नाट्यप्रयोग आणि जेष्ठ रंगकर्मी अजित भगत यांच्या सोबत दिलखुलास गप्पा रंगणार आहेत. या प्रसंगी मराठी रंगभूमीकरिता विधायक आणि भरिव कार्य करणारे दोन रंगकर्मीना 'चार मित्र कल्याण – सत्यरंग पुरस्कार' ने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार राज्यस्तर व कल्याण परिसर स्तरावर देण्यात येणार असुन, सन्मानचिन्ह व रोख रक्कम या स्वरूपात असेल. महोत्सवाच्या प्रथम वर्षीय पुरस्काराचे मानकरी आहेत, अजित भगत ( राज्यस्तरीय) आणि ललित प्रभाकर (कल्याण परिसर) हे आहेत.
@@AUTHORINFO_V1@@