दीपिका नव्हे, श्रद्धासोबत जमणार रणबीरची जोडी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |

raNBEER_1  H x


गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणबीर ही जोडी पडद्यावर पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार अशा चर्चा सुरु होत्या. याचबरोबर या चित्रपटात अभिनेता अजय देवगण ही मुख्य भूमिकेतदिसणार असल्याच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र चित्रपट निर्माते लव रंजन यांनी ट्विट करत, आपल्या आगामी चित्रपटासाठी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची निवड निश्चित झाल्याचे सांगितले आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला.




लव रंजन आणि अंकुर गर्ग या चित्रपटाची निर्मिती करणार असून २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा आणि इतर पत्रांबाद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरने एका मुलाखतीमध्ये, रणबीरसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे म्हटले होते. शिवाय तो एक उत्तम अभिनेता आहे असेही श्रद्धा म्हणाली होती. तेव्हा आता या दोघांची जोडी पडद्यावर कशी दिसेल याची उत्सुकता प्रेक्षकांनाही लागून राहिलेली आहे.

.

रणबीर कपूर सध्या आलिया भट्ट सोबत ‘ब्रह्मास्त्र’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर श्रद्धा तिच्या ‘स्ट्रीट डान्सर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

@@AUTHORINFO_V1@@