
जयपूर : २००८ साली जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये दोषी म्हणून पकडलेल्या चारही आरोपींना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष विशेष न्यायालयाने ने दोषी मोहम्मद सरवर आजमी, मोहम्मद सैफ, सैफुर्रहमान और सलमान यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या स्फोटांमध्ये ७१ लोक ठार आणि १८५ जखमी झाले होते. विशेष न्यायालायने बुधवारी या प्रकरणातील चार आरोपींना दोषी ठरवले. १ मे २००८ रोजी जयपूरमध्ये आठ बॉम्बस्फोट झाले आणि त्यात ७१ लोक मरण पावले. कोर्टाने दोषी ठरविलेल्या आरोपींमध्ये शाहबाज हुसेन, मोहम्मद सैफ, मोहम्मद सरवर आझमी, सैफूर रहमान आणि सलमान आहेत.
आरोप सिद्ध होऊ शकले नसल्याने कोर्टाने आरोपी शाहबाज हुसेनला या प्रकरणात निर्दोष सोडले. उर्वरित चार आरोपींना आयपीएसच्या कलम १२०बी अंतर्गत दोषी ठरविण्यात आले. या स्फोटांची जबाबदारी घेत ईमेल पाठवल्याचा आरोप शाहबाजवर होता. उर्वरित चार दोषींमध्ये मोहम्मद सरवर आझमी, मोहम्मद सैफ, मोहम्मद सलमान आणि सैफूर रहमान यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते.