विश्व हिंदू परिषद सेवा कुंभ २०१९ : भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ - बालवाडी प्रकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |

page 6 _1  H x

 


ठाणे शहरातील वागळे इस्टेट या भागात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून १७ बालवाड्या चालतात. १९९८ साली धर्मांतरण रोखण्यासाठी या बालवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या शिक्षिकांना वर्षाच्या सुरुवातीला दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. हिंदू धर्माचे संस्कार संस्कारांवर आधारित शिक्षण या बालवाड्यांमधून दिले जाते.

 

आपले सर्व हिंदू सण या बालवाड्यांमध्ये साजरे होतात. उदा-गोकुळाष्टमी, रामजन्मोत्सव, तिळगुळ समारंभ. वर्षाअखेरीस सर्व मुलांचाबालगोकुलम्हा कार्यक्रम एकत्रित घेतला जातो. या कार्यक्रमाला या सर्व मुलांचे पालक उपस्थित असतात. या बालवाड्यांमध्ये चालणार्या उपक्रमांमुळे हे पालकही आपल्या संघटनेशी जोडले जातात. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा मोखाडा तालुक्यात लहान मुलामुलींमध्ये कुपोषण निर्मूलन संस्कारक्षम शिक्षण या विषयाकरिता गरीब गरजू अशा पाड्यांची निवड करून त्या पाड्यातील बालवाडी कशी घ्यावी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय उपाययोजना कराव्यात, याविषयी पूर्ण तयारी करून घेऊनभगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ’, ठाणे यांच्यामार्फत बालवाड्या सुरू करण्यात आल्या.

 

सुरुवातीला जव्हार भागात २०११ साली २२ बालवाड्या, २०१६-१७ साली मोखाडा येथे ३० बालवाड्या २०१८ साली खोडाळा येथे बालवाड्या अशा एकूण ६१ बालवाड्या आहेत. दरवर्षी एकूण अंदाजे १५५० मुले या बालवाड्यांमधून शिक्षण घेतात. शिक्षिकांना खेळातून विविध उपक्रमांतून नव-नवीन कल्पना शिकवण्यासाठी दुसर्या चौथ्या मंगळवारी ठाणे येथून चार शिक्षिका प्रशिक्षण देण्यासाठी येतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून २७ पाड्यांवरील २७ बालवाड्यांतील ७३५ मुला-मुलींना पोषक आहार (खिचडी) दिला जातो. हा पोषक आहार सुरू केल्यापासून पाड्यावरील मुला-मुलींचा शारीरिक बौद्धिक विकासाचा दर उंचावला आहे.


page 6 _1  H x
 

भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ

खोडाळा येथे साडेपाच एकर जागा खरेदी केली जाणार आहे. या जागेवर पाच हजार वृक्ष लागवडीच्या माध्यमातून नक्षत्र उद्यान बाग करण्याचा संकल्प आहे. तसेच या सगळ्यासाठी त्या जागेमध्ये तलावविहीर, बोअरवेल याचीही व्यवस्था करायची आहे. या जागेवर शिक्षिका प्रशिक्षण कक्ष, स्थलांतरित वनवासींच्या मुलींसाठी वसतिगृह, राम मंदिर बांधकामाचा संकल्प आहे.

 

(अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. अश्विनी बापट ९९६९०१७३६०, श्वेता गांगल ९७६९१८८९५३)

@@AUTHORINFO_V1@@