विश्व हिंदू परिषद सेवा कुंभ २०१९ : शिव कल्याण केंद्र - मुंबई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |

VHP _3  H x W:

 


मुंबईच्या अगदी मध्य भागात सायनसारख्या ठिकाणी एक अख्खी टेकडी विश्व हिंदू परिषदेला सेवाकार्यासाठी मिळालेली आहे, हे अनेकांना माहीत नसेल. अर्थात सर्वांनी हनुमान टेकडी हे नाव कधीतरी ऐकलेलेच असेल. तर हेच आहे आपले सायन कोळीवाड्यातले ‘शिव कल्याण केंद्र.’

 

मुंबई महानगरपालिकेने १९८७ साली ही टेकडी आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला दिला. त्यावेळी या परिसरात प्रचंड अतिक्रमण आणि असामाजिक व्यवसाय सुरू होते. आजूबाजूची वस्ती अत्यंत गरीब व झोपडपट्टीची. कुठल्याही बदलाला नेहमी विरोधच होत असतो. त्यामुळे सुरुवातीला आजूबाजूच्या वस्तीतून विरोध झाला. संघर्ष करावा लागला. अर्थात ही आपल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि संयमाची कसोटी असते. या सर्व परीक्षा उत्तीर्ण करत आज शिव कल्याण केंद्र दिमाखात आपले कार्य करत आहे.

 

सर्वप्रथम आपण येथे शिलाई केंद्र आणि संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली. महाबली हनुमंताच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दीदी माँ, साध्वी ऋतंभरा आणि मान्यवर संतांच्या कथांचे कार्यक्रम झाले. आजूबाजूच्या परिसरात हे हिंदू चेतनेचे केंद्र म्हणून विकसित होण्यास सुरुवात झाली. केंद्र समाजाभिमुख होऊ लागले. याच सुमारास एक समस्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. आपल्या केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात म्हणजे सायन ते परळ भागात मुंबईतील अनेक रुग्णालये आहेत, जिथे मुंबईबाहेरून अनेक रुग्ण येतात. या रुग्णांची व त्यांच्यासोबत असणार्‍या नातेवाईकांची निवासाची मोठी गैरसोय होत असते. यात प्रामुख्याने टाटा कॅन्सर रुग्णालयातील लोक तर रस्त्यावर आसरा घेत असतात. आणि मग यातूनच अशोकजी सिंघल रुग्ण सेवा सदनाची कल्पना पुढे आली.


VHP _2  H x W:

 

दि. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी अशोक सिंघल यांच्या द्वितीय स्मृतिदिनी ‘स्व. अशोक सिंघल रुग्ण सेवा सदना’चा शुभारंभ करण्यात आला. आज तेथे ६० कॅन्सर रुग्णांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची अशा साधारण २०० जणांची राहण्याची आणि भोजनाची निःशुल्क व्यवस्था केली जाते. त्यांना टाटा रुग्णालयात जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिकेचीही व्यवस्था आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे १२०० हून अधिक कॅन्सर रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. भविष्यात एकंदर २०० रुग्ण आणि नातेवाईकांची व्यवस्था करण्याचा आपला मानस आहे.

 

सन २००१ पासून तेथे संगणक प्रशिक्षण चालू असून प्रतिवर्ष साधारण ५०० च्यावर तरुण-तरुणी त्याचा लाभ घेतात. अत्यंत माफक शुल्कात १३ संगणकांनी अद्ययावत असलेल्या या संगणक प्रशिक्षण केंद्राचा आजवर हजारो जणांनी लाभ घेतला आहे. दुर्बल घटकातील महिलांना रोजगार मिळावा, यासाठी आपण शिलाई प्रशिक्षण केंद्र चालवतो व याचा ६०० हून अधिक महिला उपयोग करून रोजगार मिळवतात. याशिवाय नियमित चालणार्‍या अभ्यासिकेत व साप्ताहिक बाल संस्कार केंद्रात ५० हून अधिक मुलं सहभागी होतात. युवकांचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ असावे म्हणून आपण योग, ध्यान तसेच कराटे प्रशिक्षण केंद्रही चालवत आहोत. महानगरी मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलात हिरवे जंगल असावे व पर्यावरण रक्षणास आपलाही हातभार लागावा, या उद्देशाने आपण ७५० झाडे लावून कृष्णवाटिका बनवत आहोत. याचबरोबर पुष्पवाटिका आणि औषधी वृक्ष वाटिकाही तयार करत आहोत.

 

(अधिक माहितीसाठी संपर्क - संजय लोढा ९८२१४७५३५६, दिलीप दाते ९८५०३२९६८८)



VHP _2  H x W:

@@AUTHORINFO_V1@@