कोरेगाव-भीमा हिंसाचारातील आरोपींना अटकेपासून दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019
Total Views |

hc_1  H x W: 0

 

मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणी आरोपींना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक तूर्त टळली आहे.

 

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना २ डिसेंबरपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. सहआरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीही २ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती पी.डी.नाईक यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने ठेवली होती. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे १ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्विस, वरवरा राव, अरुण फरेरा आदी सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील अर्जदार गौतम नवलखा यांना २ डिसेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज सुनावणी पार पडली.

@@AUTHORINFO_V1@@