२०२४ नंतर घुसखोर हद्दपार ; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्धार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019
Total Views |


af_1  H x W: 0


रांची : "आसाममध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलेली राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरची (एनआरसी) प्रक्रिया २०२४ पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात राबविण्यात येणार आहे. आज मी ही मुदत निश्चित करीत आहे. २०२४ नंतर देशात एकही घुसखोर दिसणार नाही," असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केला.

"एनआरसी प्रक्रिया राबविण्यास विविध राजकीय पक्षांचा विरोध आहे, पण राष्ट्रीय सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड न करण्याचे आमचे धोरण आहे. विरोधक एनआरसीला विरोध करीत आहेत, परंतु तो कुठल्या मुद्द्यावर ते मात्र सांगत नाहीत. २०२४ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी प्रत्येक घुसखोराची ओळख निश्चित करून, तो हद्दपार झालेला असेल, असा शब्द आज मी तुम्हाला देत आहे," असे अमित शाह यांनी येथे एका निवडणूक सभेत बोलताना सांगितले.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणतात की, "या घुसखोरांना देशाबाहेर काढू नका." "भारतातून त्यांना हाकलल्यास ते कुठे राहतील, काय खातील, ही चिंता त्यांना सतावत आहेत. राहुलबाबांना या घुसखोरांची चिंता आहे, पण खऱ्या भारतीयांविषयी त्यांना काहीच वाटत नाही. या घुसखोरांमुळे भारतीयांचे हक्क हिरावले जात आहे, याची त्यांना चिंता नाही," असा घणाघाती हल्ला त्यांनी चढविला.

यावेळी अमित शाह यांनी अयोध्येचाही मुद्दा उपस्थित केला. "हा निकाल केव्हाच लागला असता, पण काँग्रेसने वारंवार सुनावणीत अडथळे आणले आणि त्यामुळे हा वाद अनेक दशके रखडला," असे त्यांनी स्पष्ट केले. "अयोध्याप्रकरणी इतक्या तातडीने सुनावणी घेण्याची गरज नाही, असे या पक्षाचे वकील न्यायालयाला सांगायचे. मात्र, आम्ही तसे होऊ दिले नाही. न्यायालयानेही कोणत्याही पक्षकारावर अन्याय न होऊ देता, हा वाद निकाली काढला आहे," असे ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@