पंकजा मुंडे भाजपतच राहणार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019
Total Views |

Pankaja Munde _1 &nb



मुंबई : "माजी बालकल्याण व ग्रामविकास मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उठत असून पंकजाताई या भाजपला सोडून कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत.", अशी अधिकृत प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर जाणार असल्याच्या बातम्यांवर भाजपने पडदा टाकाला आहे.

 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "आत्ताचे जे एक्सिडेंटल सरकार आले आहे, त्या सरकारच्या काही मंत्र्यांनी भाजपतील बडे नेते त्यांच्या संपर्कात असल्याच्या बतावण्या केल्या आहेत. सोशल मीडियावरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा उठत आहेत. मात्र, तसला कुठलाही प्रकार होणार नाही. पंकजा मुंडे यांचे भाजपच्या प्रवासातील योगदान मोठे आहे. आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचे योगदान हे वाखाणण्या जोगे आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी न डगमगता आपले राजकीय स्थान अबाधित ठेवले आहे. त्या भाजप सोबतच आहेत.", असे स्पष्टीकरण चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
@@AUTHORINFO_V1@@