शेअर मार्केट ‘प्रॉफिट बुकिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019
Total Views |


 


शेअर मार्केटमध्ये ‘प्रॉफिट बुकिंग’ (नफा वसुली) सगळ्यात महत्त्वाचे आहे. आपण शेअर मार्केटमध्ये नफा मिळवण्यासाठीच गुंतवणूक करतो, तर आपण होणारा नफा घेतला पाहिजे. यावरती कित्येक लोक बोलतील की, मी तर ‘लॉंग टर्म इन्व्हेस्टर’ आहे तर मी का ‘प्रॉफिट बुकिंग’ करावे. ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतो त्यावेळेस आपल्यला सर्व गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. आपण भरपूर वेळा असे पाहिले आहे की, जर आपण एखाद्या शेअरमध्ये ‘प्रॉफिट बुक’ केले नाही तर तोच शेअर आपल्या खरेदीपेक्षा खाली आलेला दिसून येते. बाजारात ‘प्रॉफिट बुक’ का करावे ? वाचा सविस्तर

 

नफ्याचा वाटा सोडू नका

आज-काल आपण शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहत असतो. त्यामुळे अशा चढ-उतारात नेहमी ठराविक काळात ‘प्रॉफिट बुक’ करणे महत्त्वाचे आहे. होणारा नफा कधीही सोडू नये, ही मुख्य गोष्ट लक्षात घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करावी.

 

शेअर आणि कंपनीशी तुम्ही 'इमोशनल' आहात का ?

कित्येक गुंतवणूकदार असे आहेत ते एखाद्या कंपनीच्या प्रेमात पडतात आणि शेअर कधीही विकत नाही किंवा ‘प्रॉफिट बुक’ करत नाहीत. कोणताही शेअर खरेदी किंवा विक्री करा फक्त आपल्याला नफा होईल एवढेच लक्षात घेऊन त्यात गुंतवणूक करावी. तो कोणताही शेअर असला तरीही हरकत नाही. त्यामध्ये ‘इमोशन’ ठेवू नये. उदा. या शेअरने मला अगोदर **% नफा दिला... असे झाले होते तसे झाले... इत्यादी गोष्टी मनात न आणता सध्या जी स्थिती असेल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा.

 

शेअर घसरल्यावर खरेदी करावी का ?

कित्येक गुंतवणूकदार आपल्या आवडत्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात आणि तो शेअर खाली येत असेल तर त्यामध्ये अजून गुंतवणूक करून अॅव्हरेज करायचा प्रयत्न करतात. परंतु, हे चुकीचे आहे. कोणता शेअर किती खाली येईल, हे कोणीही सांगू शकतं. असे आपण कित्येक शेअर बघितले आहेत .त्यापेक्षा जे शेअर वधारत असतील तर त्यातच खरेदी करणे फायद्याचे ठरेल. मात्र, अशावेळी गुंतवणूकतज्ज्ञांचा सल्ला घेणेही गरजेचे ठरेल.

 

शेअर ५० टक्के वधारल्यानंतरही न विकल्यास काय होईल ?

‘प्रॉफिट बुकिंग’ केल्यामुळे आपल्यला एक वेगळा आत्मविश्वास येतो. ज्यातून शेअर बाजारावर आपण विश्वास ठेवून जास्त गुंतवणूक करतो. पण याउलट जर आपण एखादा शेअर १०० रुपयांना खरेदी केला आणि तो शेअर १७० पर्यंत गेला. परंतु, आपण ‘प्रॉफिट बुक’ केले नाही आणि तो शेअर थोड्या दिवसांनी पुन्हा आपल्या खरेदीच्या आसपास येतो. त्यामुळे केलेली गुंतवणूक तसेच वेळ फुकट जातो व आपली चिडचिड होते.

 

नफा न कमावल्याचे तोटेच खूप

जर आपण ‘प्रॉफिट बुक’ नाही केले तर त्याचे तोटे खूप असतात. त्यात आपण आपला वेळ व पैसे वाया घालवतो. शेअरची खरेदी कशी व कोणत्या क्षणी करावी जसे महत्त्वाचे आहे तितकेच त्यातून बाहेर पडणे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. आपल्याला माहिती असेलच अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये कसे जायचे माहीत होते, पण बाहेर कसे यायचे माहिती नव्हते. त्यामुळे तो त्यामध्ये अडकून राहिला. तसेच आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून नेहमी ‘प्रॉफिट बुकिंग’ करावे.

- नितिलेश पावसकर

सेबी रजिस्टर रिसर्च अॅनालिस्ट

तनिषा शेअर मार्केट अॅकॅडमी

8605168525

@@AUTHORINFO_V1@@