'पर्यावरणप्रेमी संवेदनशील माणूस'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


डोंबिवली (रोशनी खोत) : पर्यावरणासाठी घातक असलेले प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केंद्र शासन सातत्याने करीत आहे. मात्र, याकडे होणारे दुर्लक्ष करण्याची पद्धत 'जैसे थे'च आहे. या परिस्थितीतही कल्याणमधील एक अवलिया हे काम करीत आहे. विविध उपाययोजना काढीत सहयोग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विजय भोसले यांचे हे अविरतपणे काम सुरूच आहे. या वर्षात झालेला पाऊस सर्वांचा थरकाप उडवला. या पावसात मुख्यत्वाने पुन्हा एकदा प्लास्टिक हा विषय अधोरेखित केला, पण त्याची अनेकांना जाणीव होत नाही. याबाबत केंद्रीय स्तरावर राज्य स्तरावर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, मात्र नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे ही परिस्थिती सातत्याने ओढवते. यासाठी गेली ११ वर्षे भोसले यांचे काम सुरू आहे. प्लास्टिक गोळा करून पुनर्वापरासाठी पाठविण्यात आले. यात प्लास्टिक पिशव्या किंवा प्लास्टिक बाटल्या खरेदी व पुनर्वापरासाठी पाठविण्याचे काम त्यांनी केले. कल्याणमधील दुर्गाडी परिसरात नवरात्रोत्सवात येथील साहसी खेळात शिवानी गजभिये या जखमी झाल्या होत्या. या काळात त्यांच्या घरातील हलाखीची परिस्थिती लक्षात घेत भोसले यांनी मदतीचा हात पुढे केला.

 

विजय प्रभाकर भोसले यांचे प्राथमिक शिक्षण काटेमानिवली शाळा या सरकारी शाळेत झाले. लहानपणापासूनच अभ्यासू वृत्ती होती, पण खेळाची आवड असल्याने त्यांनी त्यातही भाग घेतला. पुढे शिक्षणासाठी नूतन ज्ञान मंदिर या शाळेत प्रवेश, कल्याणमधील नामवंत बिर्ला महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि अभ्यासाबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते कार्यकर्ते बनले. कल्याण पूर्वमधील स्वच्छतेचा प्रश्न त्यांना भेडसावत होता आणि त्यातून त्यांनी समविचारी मित्रांना एकत्र आणून २००९ मध्ये सुरुवात केली. ती 'सहयोग सामाजिक संस्था'. याद्वारे कोळसेवाडी व लगतच्या ग्रामीण भागात काम सुरू झाले. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, पाणी आणि नागरिकांच्या सामाजिक गरजा या विषयावर. याआधी अकरा वर्षांपूर्वी विजय भोसले यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे गावांचा प्रश्न मांडला होता. सातत्याने स्थानिक नागरिकांचे प्रश्न हे राज्य शासनाकडे तसेच केंद्र सरकारकडे मांडत आहेत. स्वच्छ भारत आंदोलनात सहभागी व्हावे आणि काम करावे म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यात प्रामुख्याने जनजागृतीचे कार्य सहयोग सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू झाले. 'कचरा दिसला की फोन करा,' यामुळे कोळसेवाडीतील अनेक ठिकाणी पडलेले कचर्‍याचे ढिगारे संस्थेने उचलले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही वैयक्तिकरित्या विजय भोसले यांच्या कामाचे कौतुक केले आहे. 'स्वच्छ परिसर, परिसर सुंदर राहावे' म्हणून अनेक ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धन करून पर्यावरण संवर्धनात सहयोग केला आणि म्हणूनच कडोंमपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'वृक्ष लागवड व शहर सौंदर्यीकरण' या मोहिमेत सहभागी होणारी कोळसेवाडीतील एकमेव संस्था होती. कोळसेवाडीतील स्वच्छतेबरोबर मानसिक स्वच्छतेवर विजय यांनी काम केले आहे. याचबरोबर विविध माध्यमांतून त्यांचे हे समाजोपयोगी काम सुरू आहे.

@@AUTHORINFO_V1@@