भारताच्या युवा क्रिकेटपटूंचा भाव वधारला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


कोलकत्ता : आयपीएल २०२०च्या लिलावामध्ये विदेशी खेळाडूंचा बोलबाला राहिला. पियुष चावला वगळता इतर भारतीय अनुभवी खेळाडूंवर जास्त बोली लावण्यात आल्या नाहीत. पियुष चावल्याची कामगिरी पाहता चेन्नईने त्याच्यावर ६.७५ कोटी बोली लावली. याव्यतिरिक्त, भारतीय युवा क्रिकेटपटूंचाही भाव वधारलेला दिसला. अपेक्षेप्रमाणे भारताच्या १९ वर्षाखालील संघामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या यंग ब्रिगेटने अनेक फ्रँचाइझींचे लक्ष वेधून घेतले होते.

 

भारताचा १९ वर्षाखालील कर्णधार असलेल्या प्रियम गर्गवर १ कोटी ९० लाखांची बोली लावली. त्याला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल २ कोटी ४० लाखांच्या बोलीसह राजस्थानच्या संघात दाखल झाला आहे. तसेच, तिसरे नाव ज्याकडे साऱ्यांचे लक्ष होते ते म्हणजे विराट सिंह. याच्यावर सनराईजर्स हैदराबादने १ कोटी ९० लाखांची बोली लावून आपल्या संघात सामील केले.

 

फक्त ३० लाख बेस प्राईझ असलेल्या वरुण चक्रवर्तीला कोलकाताने ४ कोटींमध्ये खरेदी केले. युवा खेळाडू अनुज रावत याला राजस्थान रॉयल्सने ८० लाखात विकत घेतले. त्याचप्रमाणे, २० लाख बेस प्राईझ असलेल्या कार्तिक त्यागीला राजस्थान रॉयल्सने १ कोटी ३० लाखांना विकत घेतले. रवी विश्नोई या युवा गोलंदाजांवर पंजाबने २ कोटींची बोली लागली. त्यामुळे ही यंग ब्रिगेड काय कमाल करते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

@@AUTHORINFO_V1@@