महाराष्ट्र केसरीमध्ये आता उत्तेजक चाचणीचा समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे'मध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी उत्तेजक चाचणी घेण्यात येणार असल्याचे राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी सांगितले आहे. यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २ ते ७ जानेवारी दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

‘‘राज्य पातळीवरील 'महाराष्ट्र केसरी स्पर्धा' पुण्यात होणार असून कुस्तीमध्येही उत्तेजक पदार्थ सेवन केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे यंदाच्या स्पर्धेवेळी स्पर्धकांची उत्तेजक चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा शनिवार व रविवारी सांगलीवाडी येथील चिंचबाग मदानात होणार आहे,’’ असे मोहिते यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात पार पडणार आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रती क्रीडानगरी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी २ ते ७ जानेवारी या दरम्यान रंगणार आहे. नेहमीप्रमाणे माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@