धार्मिक स्वातंत्र्यावर भारत अमेरिकेची एकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |

 
AMERICA_1  H x


नवी दिल्ली : मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य या मुद्द्यांवर भारताची इतर देशांशी तुलना करण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला आणि भारत ही एक प्रबळ लोकशाही असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. भारत ही एक जीवंत लोकशाही आहे. भारतात धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकार यांसारख्या विषयांवर लक्ष देण्यासाठी विशेष संस्था आहेत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेकडून देण्यात आली. २+२ मंत्रीस्तरीय वार्ता झाल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने माध्यमांशी संवाद साधला. मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य ट्रम्प प्रशासन आणि परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत.



पत्रकारांनी काश्मीर प्रश्नावरही प्रतिक्रिया मागितली. काश्मीरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा देण्यासाठी काही ठराविक तारीख देण्यात आली आहे का
, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली, ‘इथे अल्टिमेटम देण्याचा संबंध नाही. भारत एक असा देश आहे, एक अशी लोकशाही आहे, जिथे धोरणांवर मतदान होते, चर्चा होते, न्यायसंस्था समीक्षा करते. यामुळे मी अशा प्रकारच्या भाषेचा वापर करणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@