ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स कोटींच्या घरात ; जाणून घ्या कोणावर किती बोली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


कोलकत्ता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या रणसंग्रामाला लवकरच सुरुवात होणार आहे. शुक्रवारी आयपीएलच्या लिलावप्रक्रियेला सुरुवात झाली. पॅट कमिन्सवर सर्वाधिक १५.५० कोटींची बोली लागली. त्याला कोलकत्ता संघाने विकत घेतले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागणारा विदेशी खेळाडू ठरला. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर १०.७५ कोटींची बोली लागली. पंजाबच्या संघाने त्याला आपल्या कोट्यात शामिल केले आहे.

 

जाणून घ्या कोणावर लागली किती बोली...

 

> ख्रिस लीन २ कोटींना मुंबईच्या ताफ्यात

 

> इयॉन मॉर्गन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, ५.२५ कोटीला कोलकाताच्या संघात दाखल

 

> भारताचा हनुमा विहारीही अनसोल्ड राहिला

 

> भारताचा चेतेश्वर पुजाराही अनसोल्ड राहिला

 

> ३ कोटींच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल

 

> आरोन फिंच ४ कोटी ४० लाखांच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या ताफ्यात

 

> धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात दाखल

 

> इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्स १ कोटी ५० लाखांच्या बोलीवर झाला दिल्लीकर

 

> युसूफ पठाण आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम हे दोघेही अनसोल्ड राहिले.

 

> ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स IPL इतिहासातील महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला. त्याला १५ कोटी ५० लाखांना कोलकाताने स्वतःच्या संघात घेतले

 

> सॅम करन ५ कोटी ५० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्सने आपल्या कोट्यात सामील केले.

 

> ४.४० कोटींमध्ये आरसीबीच्या संघात सामील

 

> १.५ कोटींमध्ये जेसन रॉय दिल्ली कॅपिटलच्या संघात.

 

> ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीवर २ कोटी ४० लाखांची बोली , दिल्ली कॅपिटल्सच्या संघात

 

> मुशफिकूर रहीम, नमन ओझा, मोहित शर्मा राहिले अनसोल्ड

 
@@AUTHORINFO_V1@@