डोनाल्ड ट्रम्प विरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |

trump_1  H x W:



वॉशिंग्टन : सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज अर्थात कनिष्ठ सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. २३० विरूद्ध १९७ मतांनी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. आता ट्रम्प यांना सत्तेवरून हटवण्यासाठी उच्च सभागृह असलेल्या सेनेटमध्ये महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ज्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग चालला, त्या राष्ट्राध्यक्षांमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या बाजूने बहुमत असल्याने हा प्रस्ताव सिनेटमध्ये मंजूर होणे कठीण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र किमान २० रिपब्लिकन सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बंड पुकारले तरच ट्रम्प सत्तेपासून दूर केले जाऊ शकते.


काय आहेत आरोप ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२०च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत संभाव्य प्रतिद्वंदी जो बिदेन यांना हानी पोहोचवण्यासाठी युक्रेनमधून मदत घेतली आणि त्या बदल्यात त्या देशाला अमेरिकेकडून वेगळ्या स्वरूपात मदत दिली. यामुळे अमेरिकेची प्रतिमा मलीन झाली. याला जबाबदार ट्रम्प आहेत असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी घटनेची पायमल्ली केली असून त्यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षा आणि नि:पक्ष निवडणूक प्रक्रियेला धोका असल्याचे यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@