डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग स्कूलमध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |


dy_1  H x W: 0



पुणे : डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंगने इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, नवी दिल्ली यांच्या सहयोगाने अलीकडेच ‘मूक्स अँड मूडल- उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राचे आयोजन डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, लोहगाव, पुणे येथे करण्यात आले होते.




या चर्चासत्रात शिकवत असताना आधुनिक पद्धतीचा अवलंब करून परिणामकारकतेने कसे शिकवायचे याबाबत शिक्षकांना सूचना देण्यात आल्या. पहिल्या दिवशी आयआयटी खरगपूरचे प्रा. एस. एस. दास यांनी स्वयंपूर्णता
, मूक्स(Massive Open Online Courses)च्या गरजा, आव्हाने आणि संधी यांच्याबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले. प्रा. अनिका थापर यांनी मूक्स व्हिडिओ बनवण्यासाठी प्रत्यक्ष सादरीकरणासह टिप्स दिल्या. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी आयआयटी मुंबईतील प्रा. सुंथर यांनी प्रवेश चाचणी आणि परीक्षेत मूडल(Moodle - open source learning platform)च्या वापराबाबत मार्गदर्शन केले. अंतिमतः डॉ. विनय कुलकर्णी यांनी उपस्थितांना मूक्सचा वापर विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून परिणामकारक अध्यापनासाठी कसा करता येईल याची माहिती दिली. संस्थेचे प्राचार्य डॉ. एम. झेड. शेख यांनी प्रेक्षकांना मार्गदर्शन करून त्यांना शिकवत असताना मूक्सचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. डॉ. एफ. बी. सय्यद यांनी या चर्चासत्राचे समन्वयन केले. या चर्चासत्राला विविध महाविद्यालयांमधून १५० पेक्षा अधिक प्राध्यापक उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@